Vastushastra Anil
Monday, 8 January 2024
Wednesday, 20 December 2023
घरातील शांतता नाही , उपाय सुचत नाही ? मग करा हे .............
घरात शांतता पाहिजे ...... मग हे निरीक्षण लगेच करा ...नाहीतर वेळ निघून जाईल
जर तुम्ही सर्व उपाय करून थकून गेला आहेत ,तुम्हाला सांगितलेले सर्व उपाय करून पहिले पण काहीच फरक पडत नाही ,मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत .
आपल्या घरात बऱ्याच वेळी असे अचानक बदल आपल्याला दिसायला लागतात ,जसे कि आपण नवीन घरात प्रवेश करतो आणि काही दिवस आपले सुरळीत जातात पण काही दिवसापर्यंत आपल्या लक्षात येत नाही कि असं का होत आहे .
सुरळीत चालत असताना कोर्ट प्रकरण ,घरात पैसे टिकत नाही ,कुटुंबात वाद विवाद फार वाढतात ,मानसिक अशांतता वाढते ,एक वाद सुटत नाही कि दुसरा सुरु होतो .याच कारण आपल्याला कळत नाही .पण याच नेमकं कारण म्हणजे आपल्या वास्तूत असणारे दोष कारणीभूत असतात .
आपण बऱ्याच लोकांकडून सल्ला घेतो ,बऱ्याच जणांकडून ऐकून काही उपाय पण करतो पण नेमकं कारण आपल्या लक्षात येत नाही कि नेमकं कारण काय ?
या पोस्ट मध्ये आम्ही आपल्यासाठी नेमके प्रश्न घेऊन आलो आहोत . खाली आमच्या अनुभवातील प्रश्नाचे चिंतन केल्यावर प्रत्यक्षात केल्यावर लगेच तुमच्या लक्षात येईल कि खरॊखर ह्याच समस्या आपल्याला येत आहेत .
पुढे आम्ही दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील .
१. तुमच्या घरातील शौचालय कुठे आहे ?
२. तुमच्या घरातील स्वयंपाकघर कोणत्या दिशेने आहे ?
३.स्वयंपाकघरातील किचन ओट्यावर बेसिन ची दिशा कोणती आहे ?
४. तुमच्या घरात येणाऱ्या पाण्याची म्हणजेच नळ किंवा बोर ची जागा कोणती ?
असे असंख्य प्रश्न आहेत जे आपल्या घरातील शांतता बिघडवण्यास कारणीभूत ठरतात . काही मुख्य प्रश्न आम्ही आपल्याला सांगितले आहेत ,जर आपल्याला ह्याच समस्या येत असतील तर आम्हाला कॉमेंट करून सांगा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करणार .
वास्तू नुसार वर दिलेल्या समस्यांची उपाय आहेत ते आम्ही आमच्या पुढच्या पोस्ट मध्ये घेऊन येणार आहोत .
अशाच वास्तू विषयक समस्या व ज्योतिषीय सल्ल्यासाठी आमच्या ब्लॉग ला भरपूर शेयर करा .
धन्यवाद !
Tuesday, 19 December 2023
वास्तुशास्त्राप्रमाणे घर कसे असाव
घराच्या प्रवेशासाठी वास्तू दिशा
वास्तुशास्त्र हा घराचा फार मुख्य असा आत्मा आहे . आपले राहते घर जर वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर नेहमींच आपल्याला धन,सुख ,शांती समाधान मिळते .
पण जर आपल्याला अचानक राहते घर बदलायचे काम पडले आणि नवीन घरात आपण राहायला गेलो आणि चांगल्या शांती समाधानी जीवनात अचानक असंख्य अडचणी यायला सुरवात होते आणि आपले जीवन विस्कळीत होण्यास सुरवात होते .आपल्याला अशा अडचणी का येत आहेत याच कारण बऱ्याच वेळी लक्षात येत नाही .
पण आम्ही आपल्या साठी अतिशय शास्त्रशुद्ध माहित घेऊन आलो आहे कि जी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल . चला तर आपण या ब्लॉग मधून आपलं घर नेमकं कस असावं या विषयी माहित करून घेउया.
१.“मुख्य दरवाजा नेहमी उत्तर, ईशान्य (उत्तर-पूर्व), पूर्व किंवा पश्चिम असावा कारण या दिशांना शुभ मानले जाते. दक्षिण, नैऋत्य (दक्षिण-पश्चिम), वायव्य (उत्तर-पश्चिम, उत्तर बाजू) किंवा आग्नेय (दक्षिण-पूर्व, पूर्वेकडील) दिशेने मुख्य दरवाजा असण्याचे टाळा.